ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा फ्लायओव्हरवर अडकला. त्यावेळी नेमकं काय घडलं, याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटीचा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान काही पुरावे मांडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच सोशल मीडियावर त्या घटनेसंदर्भातले व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. असा दावा आहे की मोदींच्या ताफ्याजवळ पोहोचलेल्या व्यक्ती या शेतकरी आंदोलक नसून भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. या दाव्याच्या समर्थनार्थ काही व्हिडीओ देखील आता व्हायरल होऊ लागले आहेत. या व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली आहे.