आयपीएल साखळी सामन्यात धवनची 49 चेंडूतील 92 धावांची खेळी निर्णायक
मुंबई / वृत्तसंस्था
मयांक अगरवाल व केएल राहुल यांच्या शतकी भागीदारीनंतर देखील पंजाब किंग्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल सामन्यात पराभव पत्करावा लागला. मयांक व केएल राहुलने शतकी भागीदारी साकारल्यानंतर पंजाब किंग्सने 20 षटकात 4 बाद 195 धावांचा डोंगर उभारला तर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 18.2 षटकात 4 बाद 198 धावांसह दणकेबाज विजय संपादन केला.
विजयासाठी 196 धावांचा पाठलाग करताना दिल्लीतर्फे शिखर धवनने सर्वाधिक 92 धावांचे योगदान दिले. त्याच्या 49 चेंडूतील खेळीत तब्बल 13 चौकार, 2 षटकारांचा समावेश राहिला. पृथ्वी शॉने प्रारंभी 17 चेंडूत 32 धावा केल्या. मधल्या फळीतील स्टीव्ह स्मिथ (9) व कर्णधार रिषभ पंत (15) मात्र स्वस्तात बाद झाले. नंतर मार्कस स्टोईनिसने (13 चेंडूत नाबाद 27), ललित यादव (6 चेंडूत नाबाद 12) यांनी जलद फटकेबाजी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दिल्लीने 18.2 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यातच विजयावर कब्जा केला. झंझावाती अर्धशतक झळकावणारा शिखर धवन सामनावीर ठरला.
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. गेल, गो. अर्शदीप 32 (17 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), शिखर धवन त्रि. गो. रिचर्डसन 92 (49 चेंडूत 13 चौकार, 2 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. रिचर्डसन, गो. मेरेडिथ 9 (12 चेंडू), रिषभ पंत झे. हुडा, गो. रिचर्डसन 15 (16 चेंडूत 1 षटकार), मार्कस स्टोईनिस नाबाद 27 (13 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), ललित यादव नाबाद 12 (6 चेंडूत 2 चौकार). अवांतर 11. एकूण 18.2 षटकात 4 बाद 198.
गडी बाद होण्याचा क्रम
1-59 (शॉ, 5.3), 2-107 (स्मिथ, 10.6), 3-152 (धवन, 14.5), 4-180 (रिषभ पंत, 17.1).
गोलंदाजी
अर्शदीप सिंग 3-0-22-1, शमी 4-0-53-0, जलज सक्सेना 3-0-27-0, झाय रिचर्डसन 4-0-41-2, दीपक हुडा 2-0-18-0, रिले मेरेडिथ 2.2-0-35-1.