ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 192 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 11 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 74 हजार 838 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 245 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1,78,838 रुग्णांपैकी 1 लाख 67 हजार 073 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 653 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 2 हजार पेक्षाअधिक रुग्ण ॲक्टिव्ह
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 46 लाख 03 हजार 909 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 2 हजार 112 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 89 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 07 जण व्हेंटिलेटरवर आहेत.