ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 2,490 नव्या रुग्णांची नोंद झाली. 38 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 07 हजार 888 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 1,339 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,07,888 रुग्णांपैकी 1 लाख 86 हजार 187 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 242 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 15,459 रुग्णांवर उपचार सुरु
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 56 लाख 60 हजार 924 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 15 हजार 459 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 285 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 24 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
- शहर ॲक्टिव्ह रुग्ण
- लुधियाना 1643
- जालंधर 2131
- पटियाला 1685
- सास नगर 1868
- अमृतसर 1360