नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद साधत विविध राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कोरोनाच्या सद्यस्थितीबरोबरच राज्यांमध्ये लस कार्यक्रमाच्या वितरण व अंमलबजावणीसंबंधीचा मुद्दाही चर्चेत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मंगळवारी हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधतील. सध्या या राज्यांमध्येच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू आहे.
Previous Articleदेशात दिवसभरात 511 जणांचा मृत्यू
Next Article तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका
Related Posts
Add A Comment