बेंगळूर : केंद्रीय मंत्रिमंडळ पुनर्रचनेदरम्यान डी. व्ही. सदानंदगौडा यांनी राजीनामा दिला आहे. शुक्रवारी ते बेंगळूरमध्ये परतले. नवी दिल्लीहून बेंगळूर विमानतळावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राजीनाम्याचे कारण उघड केले. पक्षाध्यक्षांच्या सूचनेवरून आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने आपल्याला अनेक महत्त्वाची पदे भूषविण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आपण समाधानी आहे. हाती अधिकार असताना आणि नसताना देखील जनता आपल्या पाठिशी राहिली आहे. जनतेने भरभरून पेम दिल्याबद्दल त्यांचा ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया सदानंदगौडा यांनी दिली आहे. राज्य राजकारणाविषयी आताच काही सांगता येणार नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी आणि सूचनेनुसार काम करणार आहे, असेही ते म्हणाले.
Previous Articleकर भरा, अटक करण्याची वेळ आणू नका!
Next Article रविवारपासून तीन दिवस राज्यभरात मुसळधार
Related Posts
Add A Comment