प्रतिनिधी / पणजी
पणजी महानगर पालीकेतर्पे उद्या रविवारपासून पणजी सिने नॅशनल जवळ पुरुमेताचे फेस्त भरले जाणार आहे. सुमार 50 ते 60 शेतकऱयांना विक्री करण्यास परवानगी मनपाने दिली आहे. यात सर्व स्थानिक गोमंतकीय शेतकरी असणार आहे. आठ दिवस हे पुरमेताचे फेस्त असणार आहे, अशी माहिती मनपाचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने राज्यातील कुठलाच बाजार सुरु झाला नाही rत्यामुळे आमचे पारंपारिक शेतकरी, मिरची, कांदा, कोकम तसेच अन्य पुरमतोचे सामान विक्री करतात त्यांना व्यवसाय करायला मिळाला नाही. त्यामुळे मनपाने त्यांना आठ दिवस सामान विक्रीसाठी परवानगी दिली आहे. यात कोरोनाच्या सुचनांचे पालन केले जाणार आहे.
या पुरुमेताच्या फेस्तामध्ये विक्रते हे सर्व स्थानिक आहे. कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद आहे. त्यांचा उदरनिर्वाह असल्याने आम्ही त्यांना परवानगी दिली आहे. पण आम्ही कोरोनाची सर्व काळजी घेणार आहे. या ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. दोन्ही बाजूनी बेरीपेंटस् असणार आहे, असे महापौरांनी सांगितले.