प्रतिनिधी / पणजी
गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये भाज्यांसह कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झाली होते. कांदा 100 रु. किलो विकला जात होता, परंतु आता कांदा सुमारे प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांनी स्वस्त झाला असून सध्या पणजी मार्केटात प्रतिकिलो 70 रुपयात विकला जात आहे.
टॉमेटो 40 रु. कि., बटाट 50 रु. कि, गाजर 80 रु. कि, वालपापडी 40 रु. कि, मटार 80 रु. कि, वांगी 50 रु. कि, दोडगी 40 रु. कि, काकडी 20 ते 30 रु. कि, चिटकी 40 रु. कि, शिमला मिरची 60 रु. कि, मिरची 60 रु. कि, कोबी 30 रु. कि, फ्लॉवर 40 रु. एक, भेंडी 40 रु. कि, कोथिंबिर 10 रु. जुडी, मुळा 20 रु. एक जुडी, कारली 50 रु. कि, आले 80 रु. कि, लसून रु. 160 कि, व दुधी 20 रु. एक आहे.