प्रतिनिधी / वारणानगर
पन्हाळा – तालुक्यामध्ये कोरोना रुग्णाची वाढती संख्या रोखण्यासाठी शुक्रवार दि. ११ ते रविवार दि.२० पर्यन्त एकूण दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू होणार असल्याची माहिती पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी रणजीत शिंदे यानी प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहिर केला आहे.
आमदार विनय कोर, व आमदार पी.एन. पाटील यांनी पन्हाळा तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसांचा जनता कर्फ्यू करावा लागणार आहे. या बाबत जनतेच्या आरोग्याची काळजी वाटते. या संदर्भात तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पन्हाळा नगराध्यक्षा,नगरसेवक, तालुक्यातील सर्व सरपंच व सर्व पक्षीय नेते तसेच अधिकारी, प्रशासनाशी चर्चा करून जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी निर्णय घेतल्याचे सभापती शिंदे यानी सांगीतले.
सर्वांना घरातील वृध्द, लहानमुले यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाची साखळी आपणास तोडावयाची आहे. परिस्थिती अंत्यत गंभीर होत चालली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. सदर जनता कपर्युमध्ये आवश्यक सेवा दुध, मेडिकल, दवाखाने यांना वगळण्यात आल्याबाबत आमदार विनय कोरे व आमदार पी.एन. पाटील यांनी सांगितले असून या बाबत जनतेने आवश्यक ती काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. तसेच तालुक्यात कोरोना रूग्णांची एकुण संख्या -१०८४ झाली असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णाची संख्या -७२३ असून सद्या -३३२ रुग्ण उपचार घेत असल्याचे तसेच आजपर्यन्त २९ रूग्ण मयत झाल्याचे सभापती तेजस्विनी शिंदे यानी सांगितले.
Previous Articleनर्सेसच्या आंदोलनामुळे प्र. अधिष्ठातांना सक्तीच्या रजेचा अर्ज मागे घेण्याची ओढावली नामुष्की
Next Article कोवाड आरोग्य तपासणी यंत्रणेने कसली कंबर
Related Posts
Add A Comment