हजारो भाविक अंतिम दर्शनासाठी अब्दुललाट येथ दाखल
प्रतिनिधी/शिरोळ
अब्दुललाट येथील परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांचे मंगळवारी सकाळी ८ वाजून ३२ मिनिटांनी दुःखद निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. अण्णा महाराज यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजताच शिरोळ तालुक्यातील हजारो भाविकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. परमपूज्य सद्गुरु महाराज यांचा जन्म 1934 साली झाला. ते लहानपणापासून दत्तभक्त होते. त्यांनी पंचगंगा नदीकाठी भव्य दिव्य ध्यान मंदिर बांधले आहे. तसेच गावामध्ये दत्त मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरातच त्याची समाधी बांधण्यात येणार आहे.
दरम्यान, परमपूज्य अण्णा महाराज यांची सजवलेले ट्रॅक्टर मधून त्यांची अंत्ययात्रा गावातील मुख्य मार्गावरून काढली जात आहे. भाविक टाळ मृदंग, भजन कीर्तन म्हणत नामस्मरण करत आहेत. अण्णा महाराज यांच्या दुःखद निधनामुळे हजारो भक्तगणांनी शोक व्यक्त केला आहे.
