प्रतिनिधी / बेळगाव
मार्चच्या शेवटच्या आठडय़ात होणारी दहावीची परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आली. विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी व कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता कर्नाटक राज्य सरकारने हा निर्णय घेतला. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेऊन जून 25 पासून परीक्षा घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानुसार आज 25 जून पासून परीक्षेला प्रारंभ झाला खरा पण यातच एक धक्कादायक घटना समोर आली. परीक्षेचा तणाव व केलेल्या अभ्यास लक्षात राहत नसल्याने भितीपोटी विद्यार्थिनीने आपले जीवन संपविले.
सुजाता सुभाष ढगे (वय 16) रा. कलमेश्वर रोड वडगाव या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पालकवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. परीक्षेची ंिभती न बाळगता कोरोनाशी टक्कर देत विद्यार्थ्यांनी बिनधास्तपणे पेपर लिहावा असे मत पालकवर्ग व जाणकारातून व्यक्त होत आहे.