- 8 सप्टेंबरपासून सुरु होणार मेट्रोची सेवा
ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील कॅन्टोन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. राज्य सरकारने सांगितले की, मेट्रो रेल्वेची सेवा 8 सप्टेंबरपासून शिस्तबध्द पध्दतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात 7, 11 आणि 12 सप्टेंबर रोजी पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. या बाबतचे आदेश राज्य सरकारने सोमवारी जारी केले.

राज्यातील शाळा कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील. आदेशात म्हटले आहे की, 30 सप्टेंबरपर्यंत सर्व शाळा, कॉलेज, शिक्षण/प्रशिक्षण आणि कोचिंग संस्था बंद ठेवल्या जातील. तसेच सिनेमा हॉल, मनोरंजन पार्क आणि स्विमिंग पूलवर असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
तर कॅन्टोन्मेंट झोन बाहेरील भागांतील ओपन एअर थिएटर 21 सप्टेंबर पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.