पाकला लागून असलेल्या सीमेची देखरेख करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याकरता वायुदलाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. वायुदलाकडून देशातच निर्मित तेजस हे लढाऊ विमान पश्चिम सीमेवर तैनात करण्यात आले आहे. तेजस विमानाद्वारे पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर नजर ठेवता येणार आहे.
पाकिस्तान सीमेनजीक शत्रूच्या कुठल्याही आगळिकीला रोखण्यासाठी तेजस तैनात करण्यात आले आहे. दक्षिण एअर कमांडच्या अंतर्गत तेजसची 45 स्क्वॉड्रन (फ्लाइंग डॅगर्स)ला पश्चिम आघाडीवर तैनात करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वदेशी तेजसचे स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात कौतुक केले होते. एलसीए मार्क-1ए खरेदी करण्याचा व्यवहार लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. स्वदेशी विमान तेजसची पहिली स्क्वॉड्रन इनीशियल ऑपरेशनल क्लियरेन्स वर्जनची आहे. दुसरी 18 स्क्वॉड्रन ‘फ्लाइंग बुलेट्स’ फायनल ऑपरेशन क्लियरेन्स वर्जन असून वायुदलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी 27 मे रोजी कोईम्बतूर येथील सुलूर वायुतळावरून त्याचे उड्डाण केले होते.
83 मार्क-1
वायुदलाला चालू वर्षाच्या अखेरपर्यंत 83 मार्क-14ए लढाऊ विमानाचा व्यवहार अंतिम होण्याची अपेक्षा आहे. चिनी सीमेवर तणाव असल्याने वायुदलाने तेथील स्वतःचे बळ वाढविले आहे. याचबरोबर पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरही वायुदल अत्यंत दक्ष आहे.