ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
उत्तर पाकिस्तानच्या कोहिस्तानमध्ये एका बसमध्ये झालेल्या स्फोटात चिनी अभियंत्यांसह 8 जण ठार झाले. तर काही जण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
अप्पर कोहिस्तानमध्ये सुरू असलेल्या दसू जलविद्युत प्रकल्पाच्या कामासाठी चिनी अभियंते एका बसमधून जात होते. त्यावेळी या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला.या बसमध्ये 30 चिनी अभियंते आणि चिनी लष्कराचे जवान होते. स्फोटात चार चिनी अभियंते, पॅरामिलिटरी दलाचे दोन जवान आणि दोन नागरिक ठार झाले. तर काही जण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांनी आईईडीच्या सहाय्याने हा स्फोट घडवल्याचे सांगण्यात येते.