402 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद 177 कोरोनाबाधितांनीही बजावला हक्क : सोमवारी मतमोजणी
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील पाच पालिकांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत एकंदरीत 66.70 टक्के मतदान झाले. त्याद्वारे एकूण 402 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे. त्याचबरोबर सर्वण कारापूर आणि वेळ्ळी या ग्रामपंचायतींच्या प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत 78.38 टक्के मतदान झाले. म्हापसा, मडगाव, सांगे, केपे आणि मुरगाव या पाच पालिकांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यात म्हापसा-68.57 टक्के, मडगाव-64.25 टक्के, सांगे-81.49 टक्के, केपे-78.01 टक्के आणि मुरगाव-65.04 टक्के एवढे नोंद करण्यात आले आहे. आता दि. 26 रोजी होणाऱया मतमोजणीनंतर उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
म्हापसा पालिकेच्या 20 प्रभागांसाठी 68.57 टक्के मतदान झाले. एकूण 33483 पैकी 22959 मतदारांनी त्यात सहभाग घेतला. त्यातील प्रभाग क्र. 14 मध्ये सर्वाधिक 76.12 टक्के मतदान झाले. अन्यत्र प्रभाग 1 मध्ये 73.01 टक्के, प्रभाग 2-70.45 टक्के, प्रभाग 3-62.26 टक्के, प्रभाग 4-73.85 टक्के, प्रभाग 5-65.53 टक्के, प्रभाग 6-69.81 टक्के, प्रभाग 7-73.58 टक्के, प्रभाग 8-75.29 टक्के, प्रभाग 9-64.55 टक्के, प्रभाग 10-54.24 टक्के, प्रभाग 11-49.83 टक्के, प्रभाग 12-68.77 टक्के, प्रभाग 13-66.39 टक्के, प्रभाग 15-74.18 टक्के, प्रभाग 16-75.93 टक्के, प्रभाग 17-70.01 टक्के, प्रभाग 18-69.09 टक्के, प्रभाग 19-67.35 टक्के व प्रभाग 20-69.48 टक्के एवढे मतदान झाले.
मडगावात 64.25 टक्के मतदान
मडगाव पालिकेच्या 25 प्रभागांसाठी 64.25 टक्के मतदान झाले. एकूण 66413 पैकी 42670 मतदारांनी त्यात सहभाग घेतला. त्यात प्रभाग 1 मध्ये 65.15 टक्के, प्रभाग 2-63.84 टक्के, प्रभाग 3-70.01 टक्के, प्रभाग 4 – 63.45 टक्के, प्रभाग 5-63.82 टक्के, प्रभाग 6-60.50 टक्के, प्रभाग 7-74.09 टक्के, प्रभाग 8-64.56 टक्के, प्रभाग 9-67.92 टक्के, प्रभाग 10-56.53 टक्के, प्रभाग 11-67.02 टक्के, प्रभाग 12-63.04 टक्के, प्रभाग 13-72.01 टक्के, प्रभाग 14-56.55 टक्के, प्रभाग 15-69.96 टक्के, प्रभाग 16-68.38 टक्के, प्रभाग 17-62.74 टक्के, प्रभाग 18-63.14 टक्के, प्रभाग 19-57.58 टक्के, प्रभाग 20-58.49 टक्के, प्रभाग 21-60.00 टक्के, प्रभाग 22-64.49 टक्के, प्रभाग 23-56.09 टक्के, प्रभाग 24-66.67 टक्के व प्रभाग 25-68.89 टक्के एवढे मतदान झाले.
मुरगावात 65.04 टक्के मतदान
मुरगाव पालिकेच्या 25 प्रभागांसाठी 65.04 टक्के मतदान झाले. एकूण 68089 पैकी 44282 मतदारांनी त्यात सहभाग घेतला. त्यात प्रभाग 1 मध्ये 66.78 टक्के, प्रभाग 2-80.73 टक्के, प्रभाग 3-76.30 टक्के, प्रभाग 4-77.68 टक्के, प्रभाग 5-72.32 टक्के, प्रभाग 6-73.84 टक्के, प्रभाग 7-65.92 टक्के, प्रभाग 8-73.56 टक्के, प्रभाग 9-65.90 टक्के, प्रभाग 10-63.69 टक्के, प्रभाग 11-58.69 टक्के, प्रभाग 12-61.05 टक्के, प्रभाग 13-60.16 टक्के, प्रभाग 14-59.46 टक्के, प्रभाग 15-61.16 टक्के, प्रभाग 16-64.16 टक्के, प्रभाग 17-71.10 टक्के, प्रभाग 18-42.64 टक्के, प्रभाग 19-55.77 टक्के, प्रभाग 20-69.06 टक्के, प्रभाग 21-65.75 टक्के, प्रभाग 22-73.91 टक्के, प्रभाग 23-59.87 टक्के, प्रभाग 24-59.01 टक्के व प्रभाग 25-59.68 टक्के एवढे मतदान झाले.
केपेत 78.01 टक्के मतदान
केपे पालिकेच्या 13 प्रभागांसाठी 78.01 टक्के मतदान झाले. एकूण 11897 पैकी 9281 मतदारांनी त्यात सहभाग घेतला. त्यातील प्रभाग क्र. 2 मध्ये सर्वाधिक 83.46 टक्के मतदान झाले. अन्यत्र प्रभाग 1 मध्ये 82.79 टक्के, प्रभाग 3-79.95 टक्के, प्रभाग 4-82.88 टक्के, प्रभाग 5-73.47 टक्के, प्रभाग 6-76.71 टक्के, प्रभाग 7-76.88 टक्के, प्रभाग 8-80.22 टक्के, प्रभाग 9-70.89 टक्के, प्रभाग 10-67.49 टक्के, प्रभाग 11-79.61 टक्के, प्रभाग 12-81.87 टक्के व प्रभाग 13-80.89 टक्के एवढे मतदान झाले.
सांगेत 81.49 टक्के मतदान
सांगे पालिकेच्या 10 प्रभागांसाठी 81.49 टक्के मतदान झाले. एकूण 5343 पैकी 4354 मतदारांनी त्यात सहभाग घेतला. त्यातील प्रभाग क्र. 10 मध्ये सर्वाधिक 89.87 टक्के मतदान झाले. अन्यत्र प्रभाग 1 मध्ये 81.44 टक्के, प्रभाग 2-77.84 टक्के, प्रभाग 3-78.90, प्रभाग 4-81.60 टक्के, प्रभाग 5-77.57 टक्के, प्रभाग 6-77.29 टक्के, प्रभाग 7-81.93 टक्के, प्रभाग 8-80.94 टक्के व प्रभाग 9-85.67 टक्के एवढे मतदान झाले.
पंचायत पोटनिवडणुकांसाठी उत्स्फूर्त मतदान
उत्तर गोव्यातील कारापूर सर्वण आणि दक्षिण गोव्यातील वेळ्ळी या दोन पंचायतींच्या प्रत्येकी एका प्रभागासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत 78.38 टक्के मतदान झाले. त्यातील सर्वण पंचायतीसाठी 85.96 टक्के तर वेळ्ळी पंचायतीसाठी 65.59 टक्के एवढे मतदान झाले.
कोरोनाबाधितांचे पीपीई कीट घालून मतदान
पाचही पालिकांमध्ये एकूण 177 कोरोनाबाधित मतदारांनी पीपीई कीट घालून मतदान केल्याची नोंद झाली आहे. अशा रुग्णांसाठी 4 ते 5 ही वेळ राखून ठेवण्यात आली होती. त्यात म्हापसा पालिकेत 43, मडगावात 52, मुरगावमध्ये 57, सांगेत 21 आणि केपेतील 4 मतदारांचा समावेश होता. पंचायत पोटनिवडणुकीत मात्र एकाही कोरोनाबाधिताने मतदान केलेले नाही.