कोल्हापूर : प्रतिनिधी
जेष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केलेल्या संशयीत आरोपी सचिन अंदूरे व भरत कुरणे या दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर २१ ऑगस्टला सुनावनी होणार आहे. ही सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्या समोर सोमवारी दुपारी झाली.
कॉ. पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यत विरेंद्रसिंह तावडे, सारंग आकोळकर, विनय पवार, सचिन अंदूरे, भरत कुरणेसह २१ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. यापैकी आकोळकर व पवार हे दोघे अद्यापी पसार असून, याचा तपास यंत्रणेकडून कसून शोध घेतला जात आहे. याच दरम्यान अटक केलेल्या अंदूरे आणि कुरणे या दोघांनी आपली जामिनावर सुटका करावी, याकरीता जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर सोमवारी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या युक्तीवादावेळी संशयीत आरोपी अंदूरे व कुरणे याचा अप्रत्यक्ष पानसरे हत्येचा कट रचण्यामध्ये सहभाग आहे. त्यांना जामीन दिल्यास साक्षीदारांच्यावर दबाव येवू शकतो. त्यामुळे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी विशेष सरकारी वकीलांनी न्यायालयासमोर केली.
Trending
- Sangli : इस्लामपुरात गुंडाचा डोक्यात शस्त्राचे वार आणि दगड घालून खून
- Ratnagiri : रोहा डाय कंपनीच्या गोदामाला भीषण आग; एक गंभीर जखमी
- महिलांच्या छेडछाड प्रकरणी ‘झेपटो’च्या मॅनेजरसह 4 ते 5 डिलिव्हरी बॉयवर गुन्हा
- Kolhapur Breaking : कोल्हापूर जिल्हात दंगलीच्या पार्श्वभुमीवर 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद
- ‘कांदळवन व सागरी जैवविविधते’साठी 25 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- वाघोली तलाठी कार्यालयातील मतदनीसांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
- कोल्हापुरातील दगडफेकीचा ग्रामीण भागात निषेध; गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा आणि सांगरूळात कडकडीत बंद
- ‘बिद्री’वर प्रशासक आणणार नसल्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही