चिमुकलीला नाहीत पाय तरीही करते जिमनॅस्ट
एका ऍथलिट शरीरामुळे प्रथम मनाने माणूस फिट होतो. पेज कॅलेंडाइन अमेरिकेच्या ओहियोची रहिवासी आहे. 10 वर्षीय ही ऍथलिट इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण ती पायांशिवायच जन्मली आहे. तरीही ती जिमनॅस्ट करते.
आईवडिलांची साथ
तिच्या आईवडिलांचे नाव सीन आणि हैदी आहे. पेज 18 महिन्यांची असतानाच तिच्या आईने तिला जिमनॅस्ट क्लासेसमध्ये पाठविणे सुरू केले होते. आम्ही आमच्या मुलीला मजबूत करू इच्छितो, लाचार नव्हे असे हैदी यांनी म्हटले आहे.
दिव्यांगाप्रमाणे वागणूक नाही

तिचे आईवडिल तिला दिव्यांगाप्रमाणे वागवत नाहीत, आम्ही तिला दिव्यांगाप्रमाणे वाढविले नाही. जगाचा सामना करणे तिला सोपे ठरावे म्हणून हा निर्णय घेतल्याचे सीन यांनी सांगितले आहे.
सिद्ध करून दाखविले
पेजने प्रशिक्षणानंतर कुणाला निराश केले नाही. आपल्यामध्ये ऍथलिट लपला असल्याचे तिने दाखवून दिले आहे. ऍथलिट तयार करण्यासाठी ती सातत्याने प्रशिक्षण घेत आहे. तसेच तिने स्वतःसोबतच्या खेळाडूंनाही प्रेरित केले आहे. पेजने आतापर्यंत अनेक पदके पटकाविली आहेत.
पोहण्यातही रुची

पेजला याचबरोबर पोहो आणि धनुर्विद्येतही रुची आहे. जीवनात कधीही काहीही घडू शकते. तुम्ही केवळ प्रयत्न करू शकता हेच लोकांना सांगू इच्छिते. स्वतःचा कमकुवतपणा जाणून घ्या आणि स्वतःशीच लढा असा संदेश ती देते.