विशाल कदम/ सातारा
आपल्या पेठेतील आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या, नागरिकांचे प्रश्न पालिकेच्या विविध होणाऱया सभेत मांडल्या तर कामे होतात. तर काहीजण सभेला न येताही कामांची चुणूक प्रभागात दाखवून देतात. सातारा पालिकेत असलेल्या 46 नगरसेवकांची दि. 14 ऑगस्ट 2020 ते 25 मार्च 2021 या कालावधीत झालेल्या 9 सभांना 46 नगरसेवकांपैकी एका नगरसेविकेने कोणतीही सभा अटेंड केलेली नाही तर चार नगरसेवकांनी 1 सभेला हजेरी लावली तर पाच नगरसेवकांनी सगळय़ा सभांना हजेरी लावली. हजर राहूनही भत्ता न घेणाऱयांमध्ये 9 जणांचा समावेश आहे. उपस्थिती भत्ता म्हणून 96 हजार 800 रुपयांचे मानधनही देवू करण्यात आले आहे.
पालिकेची सर्वसाधारण सभा असेल किंवा इतर होणाऱया सभा या कोरोना काळात ऑनलाईन होत होत्या. त्या सभांना काहींनी गैरहजेरी लावली. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हजर राहणे महत्वाचे असते. परंतु काही नगरसेवकांनी या सभांनाही हजर राहणे टाळले. दि. 14 ऑगस्ट 2020 ते 25 मार्च 2021 या आठ महिन्याच्या काळात 9 पालिकेच्या सभा झाल्या. या सभांना नगराध्यक्षा माधवी कदम 9, किशोर शिंदे 8, सीता हादगे 9, मिलिंद काकडे 6, स्नेहा नलावडे 8, कुसूम गायकवाड 1, विशाल जाधव 1, रजनी जेधे 7, निशांत पाटील 5, मनिषा काळोखे 5, शेखर मोरे-पाटील 3, श्रीकांत आंबेकर 1, सविता फाळके 6, बाळू खंदारे 5, दीपलक्ष्मी नाईक 5, संगिता धबधबे 9, शकिल बागवान 5, ज्ञानेश्वर फरांदे 6, लता पवार 5, मनोज शेंडे 7, संगीता आवळे 6, सुमती खुटाळे 0, राजू भोसले 6, स्मिता घोडके 6, अल्लाउद्दीन शेख 3, यशोधन नारकर 2, सुजाता राजेमहाडिक 6, अशोक मोने 5, अनिता घोरपडे 8, आशा पंडित 5, अमोल मोहिते 5, प्राची शहाणे 7, धनंजय जांभळे 9, सिद्धी पवार 6, विजयकुमार काटवटे 5, सुनीता पवार 6, वसंत लेवे 4, सोनाली नलावडे 6, रवींद्र ढोणे 5, लीना गोरे 5, सुहास राजेशिर्के 3, ऍड. दत्ता बनकर 9, प्रशांत आहेरराव 1, सुनील काळेकर 2, बाळासाहेब ढेकणे 4 अशी हजेरी आहे.