कुटुंबात राहणाऱया श्वानाचा घरातील मुलांसोबत विशेष ताळमेळ असतो. ते एकत्र फिरतात, मुले कुठे थांबल्यास ते देखील थांबतात. शारीरिक दृष्टय़ा त्यांचा हा ताळमेळ मुलांसोबत भावनात्मक बंधही दर्शवितो. मुले आणि त्यांच्या पाळीव श्वानांवरील पॉग्नँट या संस्थेने केलेल्या एका संशोधनात हे आढळून आले आहे. संशोधनानुसार अशाप्रकारच्या जवळीकीमुळे पाळीव श्वान आणि मुले दोघांचाही भावनात्मक विकास अधिक होतो.

लोक आणि अन्य प्राणी कसे वागतात हे या संशोधनातून दिसून येते. मुले आणि श्वान परस्परांकडून कशाप्रकारे उत्तर पद्धतीने रहावे-वागावे हे शिकतात. पाळीव श्वान घरातील मुलांना कुठेही ये-जा करण्यासाठी कशाप्रकारे प्रेरित करतात हेही यात आढळून आले आहे. दोघेही परस्परांना एक भावनात्मक बंध आणि सहकार्याचे माध्यम ठरतात.