राज्यमंत्री यड्रावकरांनी घेतला पुरस्थितीचा आढावा
प्रतिनिधी / कुरुंदवाड
कर्नाटकातील अलमट्टी धरण वडनेरे अहवालाबाबत आता न बोलता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या पाणी विसर्ग याबाबत समन्वय असल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापूर सदृश्य स्थिती येणार नाही मात्र येत्या 20 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास परिस्थिती वेगळी होऊ शकते. यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे अशी माहिती आज आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिरोळ तालुक्यातील पूरस्थितीबाबत त्यांनी आज नृसिंहवाडी, राजापूर बंधारा, तेरवाड बंधारा, औरवाड, कुरुंदवाड पाहणी केली . यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री यड्रावकर म्हणाले की सांगली जिल्ह्यातील दुष्काळ भागाला पाणी वळवण्यात बाबत टेंभू , म्हैसाळ योजना दोन दिवसात सुरु करण्याबाबत जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सांगितले.
ते म्हणाले कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याबाबत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांचा सातत्याने संपर्क आहे. मागील महापुरातील चुका होऊ नयेत याची खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज सोमवार पासून अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार इतका पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापौर सदृश्य स्थिती निर्माण होणार नसली तरी पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या आपल्या तालुक्यात कोयना वारणा राधानगरी साधी धरणातून सुमारे 96 हजार इतका विसर्ग नदीत होत आहे. दोन राज्याचा समन्वय असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता फारच कमी आहे असे त्यांनी शेवटी नमूद केले.
Trending
- लोणंद पालखी तळावर,वारकऱ्यांच्या दिंड्यांबाबत महसूलमंत्र्याची सक्त सूचना
- फ्रान्समध्ये चाकूहल्ल्यात 4 बालके जखमी
- जपानमध्ये तरुणाईला हसण्याचे प्रशिक्षण
- अशोक लेलँडची मध्यम, अवजड वाहन विक्री पूर्वपदावर
- मणिपूरमध्ये लष्कराकडून शस्त्रास्त्रांची शोधमोहीम
- ‘गॅरंटीं’साठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका
- भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद
- शक्तीभोग फूडस् खरेदीसाठी आयटीसीचे प्रयत्न