ऑनलाईन टीम
पिंपरी चिंचवड महापालिकेवर आज अचानक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. एसीबीने अचानक केलेल्या या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेतील स्थायी समिती कार्यालयाचा लाचलुचपत विभागाने ताबा घेतला आहे.
आज महापालिकेत स्थायी समितीची बैठक होती. यामुळे महापालिकेत मोठी गर्दी होती. ही बैठक संपताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. मनपाच्या इमारतीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एसीबीचे अधिकारी तेथील कागदपत्रांची तपासणी करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Related Posts
Add A Comment