ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय हवामान विभागाने केरळसह 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात हलका ते अतिवृष्टीच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय. तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. हवामान खात्याच्या अंदाज आणि चेतावणीनुसार, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाव्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात पुढील 5 दिवसांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.