प्रतिनिधी / इस्लामपूर
पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेच्या वतीने प्रा. एन. डी. चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली. संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी या उमेदवारीची घोषणा केली.
प्रा.चौगुले हे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, पन्हाळाचे अध्यक्ष आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी सदस्य तसेच एन. डी. चौगुले अर्बन मल्टिपर्पज निधी (बँक) चे चेअरमन आहेत. ग्रामीण भागातील पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रा. चौगुले यांच्या उमेदवारीमुळे मदत होईल, असे सांगून गुरुवार दि.१२ नोव्हेंबर २०२० रोजी प्रा.चौगुले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असे आमदार खोत यांनी सांगितले.