ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील गोल्डमॅन आणि प्रसिद्ध उद्योजक सम्राट मोझे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
येरवड्यात संगमवाडी येथे राहणारे मोझे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. अंगावर भरमसाठ सोने घालण्यासाठी सम्राट मोझे प्रसिद्ध होते. मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडे आठ किलो सोने घालत होते. गेल्या आठवड्यात सर्व आपला 39 वा वाढदिवस साजरा केला होता.
त्यांचे बालपण चिंचवड येथे गेले. प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चाफेकर शाळेत झाले होते. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. चुलते आणि माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला होता.
काही दिवसांपूर्वीच मोझे यांनी बनावट फेसबुकच्या माध्यमातून त्यांची बदनामी केली जात असल्याचीतक्रार पोलिस सायबर सेलकडे केली होती.