मुंबई / ऑनलाईन टीम
सध्या राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पुण्यात देखील रूग्णांचा आकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. ही परस्थिती ओळखून पुणे किंवा ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे लॉकडाऊन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
पुण्यातील कोरोनाची स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाऊन लावा अशी सूचना मुंबई हायकोर्टाने केली आहे. आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने यावेळी म्हटलं. राज्यातील करोना स्थितीचा आढावा मुंबई हायकोर्ट घेत असून सुनावणीदरम्यान ही सूचना करण्यात आली. कोर्टाने यावेळी पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं. तसंच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असं मत नोंदवलं,
हायकोर्टाने यावेळी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला पाहिजे सांगत जर मुंबई मॉडेलंच सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं असेल तर इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे असा सल्ला दिला.
Trending
- श्वानाला मिळाली मानद पदविका
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
- प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा
- एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
- चार गॅरंटींची आज घोषणा?
- पर्यटकांमुळे अंटार्क्टिकात वितळतोय बर्फ
- आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोराला कंठस्नान
- तांत्रिक बिघाडामुळे चामराजनगरजवळ कोसळले प्रशिक्षण विमान