मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना लसीच तुटवडा असल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकारामध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याचा कोरोना लस घेतल्याचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. सध्या देशभरात 45 वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसणाऱ्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे, असं यावेळी त्यांनी सांगितलं.
का होत आहे टीका ?
माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा तन्मय फडणवीस नातू आहे. त्याचे वय 25 वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने कोरोना लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला होता. परंतु विरोधकांकडून टीका होताच तो फोटो हटवण्यात आला होता. परंतु तोपर्यंत अनेकांनी त्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतले होते.
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन