बेळगाव ः
प्रतिनिधी
पिरनवाडी संगोळी रायाण्णांचा पुतळा उभारल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी मध्यरात्री काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-पणजी राष्ट्रीय मार्गावरील पिरनवाडी नाक्मयावर अंधाराचा फायदा घेत खढांतीवीर संगोळी रायाण्णांचा पुतळा उभारला. गेल्या पंधरा दिवसांपासून पुतळा उभारणीवरून वातावरण तापलेले होते. पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या अनेक वर्षांपासून छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. या ठिकाणी छ. शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. पिरनवाडी ग्राम पंचायतीमध्ये तसा ठरावही करण्यात आला आहे.

पिरनवाडीत संगोळी रायाण्णा यांचा पुतळा बसविण्यास मराठी भाषिकांचा विरोध नाही, पण छ. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर संगोळी रायाण्णांचा पुतळा नको, अन्य ठिकाणी बसवा, त्याला आम्हा गावकऱयांच्याही सहकार्य आहे, असे गावकऱयांचे म्हणणे आहे.
रायाण्णा यांचा पुतळा बसविल्यामुळे शुक्रवारी मराठी बांधव एकत्र आले व त्यांनी याचा तीव्र निषेध केला. तरूण व महिला रस्त्यावर उतरल्यामुळे तणाव सदृशस्थिती निर्माण झाली. दरम्यान मोठा पोलीस फौजफाटा पिरनवाडीत तैनात केला आहे. जमावाला शांत करण्यासाठी पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
