बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने मंगळवारी पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार जाहीर केला. पुनीत राजकुमार राज्याच्या सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त 10 वे व्यक्ती असतील. वीरेंद्र हेगडे यांना ते 2009 मध्ये शेवटचे देण्यात आले होते.
गेल्या महिन्यात वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झालेल्या अभिनेता पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “राज्य सरकारने दिवंगत श्री पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.”
कर्नाटक रत्न हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुनीत राजकुमार हे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा मुलगा होता. गेल्या महिन्यात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मौर्य, आरासू, रामांद अंजनी पुत्र यांसारख्या चित्रपटात मुख्य भुमिकेत असलेल्या या अभिनेत्याच्या पश्चात पत्नी अश्विनी रेवंत असून त्यांना दोन मुले आहेत.