वार्ताहर / पुलाची शिरोली
शिरोली पोलीस व ग्रामपंचायतीच्या वतीने विना मास्क व सोशल डिस्टन्स न पाळणारे लोकांच्यावर कडक कारवाई करण्यात आली. सोमवारी दिवसभरात बारा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हि कारवाई स.पो.नि. किरण भोसले, सरपंच शशिकांत खवरे, ग्रामविकास अधिकारी ए.एस. कठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
शिरोली पोलीस व शिरोली ग्रामपंचायत यांनी दोन दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन कमिटीची बैठक घेऊन गावातील सर्व प्रकारचे दुकानदार, व्यावसायिक व ग्रामस्थांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एस .एम .एस या ञिसुञीची काटेकोर अंमलबजावणी करुन प्रशासनाला सहकार्य करावे. जो कोणी उल्लंघन करील त्याच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद केली जाईल असे आवाहन केले होते.
सोमवारी सकाळी गावभाग व माळवाडी भागात अचानक भेट दिली असता अनेक दुकानदार व ग्रामस्थांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यांच्यावर रोख रक्कमेची कारवाई करून बारा हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईत स.फौजदार रमेश ठाणेकर, राजाराम पाटील, रोहित लोखंडे, नितीन परमाज, हरि वंडकर, अमोल तिरपणे, सर्जेराव पाटील यांनी सहभाग घेतला.
Previous Articleपुलाची शिरोलीत सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर कारवाई
Next Article जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1,013 नवे कोरोना रुग्ण
Related Posts
Add A Comment