प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या निर्माण होत आहेत. याची दखल घेऊन भारत पेट्रोलियम लिमिटेडतर्फे जिल्हय़ातींलह विविध 15 पेट्रोलपंपावर एटीएम सुविधेची सुविधे सुरवात करण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात शहरासहीत ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडून पैसे आणण्यासाठी बँक शाखेपर्यंत जाणेही कठीण बनले आहे. याची दखल घेऊन भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या या एटीएम सुविधेचा आपल्या जवळच्या आरओला भेट देऊन नागरिकांनी लाभ करून घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.