पेट्रोल 84 पैसे, डिझेल 79 पैशांनी महागले : इंधन दरवाढीने नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
रशिया-युपेन युद्धाचा परिणाम आता देशालाही सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने मंगळवारी इंधनाची दरवाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात 79 पैसे वाढ झाल्याचे दिसून आले. बऱयाच दिवसांपासून स्थिर असणारा इंधनाचा दर वाढल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे होरपळत असलेल्या नागरिकांना इंधन दरवाढीची झळ बसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरेल मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. युद्ध सुरू असल्यामुळे दरात वाढ होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी इंधनाची दरवाढ अपेक्षित होती. परंतु 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल असल्याने दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. निकाल जाहीर होताच आठवडाभरात इंधनाची दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ यापुढेही अशीच सुरू राहण्याची शक्मयता वर्तविली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता
वाहतूक खर्च हा पूर्णपणे डिझेलवर अवलंबून असतो. डिझेलच्या दरात वाढ होताच वाहतूक खर्च वाढतो. प्रवासी वाहतुकीसोबतच इतर वाहतुकीचा दर वाढणार आहे. आधीच महागाईची झळ बसल्याने सर्वसामान्यांचे हात पोळत असताना इंधन दरवाढीमुळे यामध्ये वाढ होणार आहे. वाहतूक दरवाढ झाल्यास भाज्यांसह इतर सर्वच वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित सांभाळताना नाकीनऊ येणार आहेत.
सोमवारी बेळगावमध्ये पेट्रोल 100.32 तर डिझेल 84.80 रुपयांनी विक्री केले जात होते. मंगळवारी दरवाढ झाल्यामुळे पेट्रोल 101.16 तर डिझेल 85.59 रुपयांवर पोहचले. बऱयाच दिवसांनी पेट्रोलने शंभरी ओलांडून पुढे वाटचाल केली आहे. पुढे अजून वाढ होण्याची शक्मयता असल्याने मंगळवारी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
शहराचे नाव | पेट्रोलचा दर | डिझेलचा दर |
कोल्हापूर | 110.93 | 93.73 |
बेळगाव | 101.16 | 85.59 |
पणजी | 97.19 | 88.09 |