सातारा जिल्हा पेट्रोलियम डिलर्सचा सहभाग
प्रतिनिधी/ सातारा
मागील पाच वर्षात भांडली गुंतवणुकीत दुप्पटीने वाढ झाली मात्र मार्जिन वाढले नाही. चकीच्या दरबदलाच्या धोरणांमुळे अनेकदा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच पेट्रोलच्या दरात बदल करताना डिलर्सना कधीही विश्वासात घेण्यात येत नाही, किंवा त्यांच्या नुकसानीचाही विचार केला जात नाही. पेट्रोल पंप कर्मचाऱयांसाठी कोणतेच विधायक धोरण राबविण्यात आले नाही. नोटाबंदी असो वा कोरोना महामारीचा काळ आम्ही नेहमीच शासनाला सहकार्या केले आहे, तरी ही आमचा विचार केला जात नाही, या विरोधात देशातील पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने आज खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये सातारा जिल्हय़ातील डिलर्स ने ही सक्रीय सहभाग दर्शविला आहे.
2017 पासून तेल कंपन्यांनी आमचे मर्जिन ठरल्या प्रमाणे वाढवलेल नाही. ते कमिशन/ मर्जीन तत्काळ वाढवावे व 2017 पासूनच फरक द्यावा. केंद्र सरकार ने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी रात्री मध्ये एक्साईज डुटी मध्ये कमी केली. त्यामुळे दोन वेळा सर्व पंप धारकांना लाखो रुपयांचा फटका बसला. एक्साईज रात्री आपण सरकार ला भरून माल घेतला होता, परंतु दर कमी झाल्यामुळे आम्ही तो ग्रहांकां कडून वसूल करू नाही शकलो. तो एक्साईज फरक सरकार ने कंपन्यांनी परत द्यावे, आदी मागण्याही या अंतर्गत करण्यात येत आहेत.
पंपावर लागल्या रांगाच रांगा
मंगळवारी पेट्रोल पंपच बंद असणार असल्याची अफवा अनेक ठिकाणी पसरल्याने सोमवारी सायंकाळच्या सुमारास साताऱयातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहन चालकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहनात पेट्रोल नसल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल या भीतीने अनेक सातारकर आपल्या वाहनात पेट्रोल पुर्ण पणे भरून घेताना दिसत होते.
ग्राहकांची कोणतीच गैरसोय नाही
पेट्रोल डिलर्सच्या समस्यांकडे लक्षवेधण्यांकरीता देशव्यापी खरेदी बंद आंदोलन आज पुकारण्यात आले आहे. पण यामुळे ग्राहकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची ही खबरदारी पुर्णपणे घेण्यात आली आहे. खरेदी जरी बंद असली तरी एक दिवसाच्या आगाव पेट्रोलचा साठा, प्रत्येक डिलर्सची आपल्या पंपावर उपलब्ध करून ठेवला आहे, जेणे करून ग्राहकांची कोणतीच गैरसोय होणार नाही.
रितेश रावखंडे
रेणुका पेट्रोल पंप, सातारा