गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे,पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घेतले श्री भगवती देवीचे दर्शन

प्रतिनिधी /पेडणे
पेडणेची प्रसिद्ध पुनव रविवारी मोठय़ा उत्साहात साजरी झाली. या उत्सवासाठी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक भागातील हजारो संख्येने सकाळपासून श्री भगवती देवी, श्री रवळनाथ देव, आदिस्थान देवाचा मांगर या मंदिरात जाऊन तरंगाचा देवदर्शन मोठय़ा संख्येने भाविकांनी घेतले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही खास उपस्थिती लावून श्री भगवती देवीचे दर्शन घेतले. यावेळी पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तथा चांदेल सरपंच तुळशीदास गावस, पेडणे भाजप मंडळ सरचिटणीस तथा नगरसेविका उषा नागवेकर, नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेवक मनोज हरमलकर, आनंद सावळ देसाई खाजने – अमेरे- पोरस्कडेच्या सरपंच निशा हळदणकर, रुदेश नागवेकर आदी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भगवती मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. पेडणे परिसर विविध प्रकारची दुकाने, फूल विपेते, खेळण्यांची दुकाने, खाजांची दुकाने, कपडय़ाचे स्टॉल, भाडय़ांची दुकाने आदींनी परिसर फुलून गेला होता. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने फुलून गेला होता. गेली दोन वर्षे कोरोनामुळे येथील पुनव उत्सवावर काही प्रमाणात निर्बंध आले होते. यंदा मात्र झाल्यामुळे मोठय़ा उत्साही वातावरणात पुनव उत्सव साजरा झाला.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वात विकासाला गती
भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी श्री भगवती देवी, श्री रवळनाथ देव आणि देवाचा मांगर याठिकाणी जाऊन देवदर्शन घेतले. यावेळी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना पेडणे तालुक्मयाच्या विकासासाठी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना वेळोवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्य मिळणार असल्याचे सांगितले. पत्रकार यांनी भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांना विचारले असता सध्या गोव्याच्या राजकारणाला वेगळी वळण मिळत आहे. भाजपमध्ये काँग्रेसचे आठ आमदार आल्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आसन बदलणार का? यावर सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा गतिमान विकास चालू आहे. मुख्यमंत्री बदलण्याचा कोणताच प्रश्न नाही, असे स्पष्ट केले. शिवाय जे काँग्रेस मधून भाजपात आमदार आलेले आहेत त्यांना कसल्याच प्रकारचे आश्वासन पक्षाने दिले नाही. किंवा एखाद्या मंत्र्याला काढून त्या जागी दुसरा मंत्री बसवण्याची शक्मयताही नसल्याचे तानवडे यांनी सांगितले.
भविष्यात पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत विचारले असता सध्या आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे हस्तकला महामंडळ सरकारने दिलेले आहे. सध्या मंत्रिमंडळाचा आकडा मर्यादित तो वाढवता येत नाही. भविष्यात पुढच्या निवडणुकीत काहीही बदल होऊ शकतो, असे तानावडे सांगितले.
मांदेचे आमदार भाजपात येणार असतील तर त्यांना प्रवेश देणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता उत्तर देताना सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर आणि मांदेचे आमदार जीत आरोलकर यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला आहे. जीत आरोलकर यांना पक्षात प्रवेश घ्यायचा असल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन यावे लागेल सध्या तरी तसा प्रस्ताव आपल्यापर्यंत पोहचला नसल्याचे सदानंद तानवडे यांनी स्पष्ट केले. पेडणे तालुक्मयात तीन मतदारसंघ करण्यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता या निवडणुकीत तरी शक्मय नसल्याचे त्यांनी सांगितले