भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांचा अर्ज दाखल
प्रतिनिधी / पेडणे
पेडणे तालुक्मयातील तीन पंचायतीसाठी होणाऱया निवडणुकीसाठी शनिवारी एकूण अर्ज 11 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
दरम्यान चांदेल-हसापूर पंचायतीचे माजी सरपंच तथा पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी आपल्या समर्थकांसोबत अर्ज दाखल केला.
हळर्ण पंचायतीसाठी आठ, चांदेल-हसापूर पंचायतीसाठी दोन तर कासरवर्णे पंचायतीसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
हळर्ण पंचायत प्रभाग 3- मधून दोन उमेदवार – रामचंद्र राघोबा परब व चिंतामणी महादेव नाईक, प्रभाग 5- मधून बाबन आत्माराम नाईक व शैलेश भिकाजी नाईक. प्रभाग 6- आरती नारायण राऊळ व दर्शना दयानंद नाईक. प्रभाग 7 – पेट्रिसिया फेलिसिदाडे फर्नांडिस व क्रिस्तेलीना फर्नांडिस.
कासरवर्णे पंचायत प्रभाग 3- दीपेश दिलीप नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चांदेल हसापूर पूर पंचायत प्रभाग 3 मधून तुळशीदास वासुदेव गावस व प्रभाग 4 मधून आनंद विष्णू महाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.