अव्वल कारकून, लेखापालाच्या गलनाथपणामुळे तीन महिने पगार नाही : नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पालिकेच्या गलनाथ कारभाराचा फटका सफाई कामगारांना बसला आहे. पालिकेचा अव्वल कारकून व लेखापाल यांच्या कामातील निष्काळजीपणामुळे पालिकेच्या सफाई कर्मचाऱयांना तीन महिने तर कधी दोन महिने पगाराची प्रतीक्षा करावी लागत आहे. याविरोधात सफाई कामगारांनी काम बंद कामबंद आंदोलन करत निषेध केला. पगार वेळेवर न दिल्यास यापुढे गोळा न करण्याचा इशाराही दिला.
दरम्यान, याची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष माधव सीनाई देसाई व मुख्याधिकारी अनिल राणे यांनी सफाई कामगारांसह अन्य कर्मचाऱयांशी चर्चा करुन सोमवारपर्यंत पगार देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचाऱयांनी आंदोलन मागे घेतले.
पेडणे पालिकेच्या गलनाथ कारभाचा फटका नागरिकांना बसतोच आतातर सफाई कामागारांनाही बसला आहे. सफाई कामगार तसेच अन्य कर्मचाऱयांची पगार बिले अव्वल कारकून वेळेवर देत नाहीत लेखाधिकारी त्यांना सहकार्य करतो. तसेच ते कामावरही वेळेवर येत नाहीत, अशा तक्रारी आहेत. पगारासाठी सतावाणूक करत असल्याच्या तक्रारी सफाई कामागारांनी नगराध्यक्षांकडे यावेळी केल्या.
सफाई कामगार हे प्रामाणिकपणे तसेच नियमितपणे आपले काम चोखपणे करत आहे. आहेत. गुरुवार भरणाऱया आठवडा बाजारातील भाजीपाला विपेत्यांचा कचरा, कुजलेली भाजी तसेच संपूर्ण पालिका क्षेत्राती कचरा गोळा करण्याचे काम प्रामाणिकपणे हे कामगार करतात. मात्र या हातावर पोट असलेल्या कामागारांचे अन्य कुठाल्याच प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही. त्यांनी उपजीविका कशी करावी, असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित. कायम असलेले कर्मचारी तसेच लेखाधिकारी गलेलठ्ठ पगार घेतात मात्र त्यांना आमची व्यथा कळत नाही. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत तीव्र संताप या कामगारांनी व्यक्त करत अव्वल कारकून व लेखाधिकारी यांचा पाढाचा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या समोर वाचला.
पालिकेच्या मागील बैठकीतही या दोन कर्मचाऱयांच्या विरोधात पडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आलेकर यांच्या समक्षच पालिकेच्या नगरसेवकांनी
नगराध्यक्ष महादेव सीनाई देसाईकडे त्याचा पाढाच वाचला होता. मात्र त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि तसा शब्द त्यांनी घेतल्यानंतर संबंधित कर्मचाऱयांना समज दिली होती. मात्र पुन्हा पंधरादिवसांनंतर आता या कर्मचाऱयांच्या पगाराबाबत तक्रारी समोर आल्या. अशा प्रकारच्या गलथान कारभाराद्वारे पालिकेचे दोन कर्मचारी हे सर्व पालिका मंडळाला वेठीस धरण्याचे काम करत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला.