प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलिसांनी रोहन कोरगावकर राहणारा कखवाडा काणका पर्रा येथील या 33 वर्षे इसामाला मंगळसूञ चोरी प्रकरणी पेडणे पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून रु.1लाख 7500/- किंमतीचे मंगळसूञ जप्त केले. संशयीत आरोपीने दुचाकी क्रमांक जीए.07 एई 0440 ही गाडी चोरी करण्यासाठी वापरली होती तिही पेडणे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर चोरीचा गुन्हा नोंद करत अटक केली आहे. पुढील तपास पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.