मोपा विमातळप्रश्नी सूर्यकांत चोडणकर व ऍड. जितेंद्र गावकर यांना अटक केल्याचा निषेध
प्रतिनिधी / पेडणे
रस्त्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी भूसंपादन विभागाचे अधिकारी पाळयेवाडा धारागळ येथे 27 रोजी गेले असता स्थानिक शेतकऱयानी यावेळी या कर्मचाऱयांना जाब विचिरला होता. .शेतकऱयांसोबत यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा गोंयचो आवाज संघटनेचे सदस्य सूर्यकांत चोडणकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे पेडणेचे नेते ऍड. जितेंद्र या दोघांनी शेतकऱयांना समर्थन केले होते. त्यावेळी भूसंपादन विभागाचे कनि÷ अभियंते दिनेश हडफडकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणल्याचे व आपणास मारहाण केल्याची पेडणे पोलीस स्थानकात चोडणकर आणि गावकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनतर हे दोघेही स्वतः पेडणे पोलिसांत शुक्रवारी हजर झाले असता त्यांना पोलिसांना अटक केली. या निषेधार्थ पेडणे पोलीस स्थानकावर शेतकऱयांनी मोर्चा आणून निषेध केला.
सरकारने मोपा विमानतळ प्रकल्पासाठी धारगळ ते मोपा विमानतळ प्रकल्प पर्यंत राष्ट्रीय महामार्ग लिंक रस्ता करण्यासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या जमिन संपादन करण्यापूर्वी सरकारने स्थानिक शेतकऱयांना कोणतीही पूर्व कल्पना न देता ही जमीन संपादन करण्यासाठी भूसंपादन विभागाचे अधिकारी पाळयेवाडा धारागळ येथे 27 रोजी गेले असता स्थानिक शेतकऱयानी यावेळी या कर्मचाऱयांना जाब विचिरला. .शेतकऱयांसोबत यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा गोंयचो आवाज संघटनेचे सदस्य सूर्यकांत चोडणकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे पेडणेचे नेते ऍड. जितेंद्र या दोघांनी शेतकऱयांचे समर्थन केले असता याठिकाणी आलेल्या भूसंपादन विभागाच्या कनि÷ अभियंते दिनेश हडफडकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणल्याचे व आपणास मारहाण केल्याची पेडणे पोलीस स्थानकात सूर्यकांत चोडणकर आणि जितेंद्र गावकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरुन पेडणे पोलिसांनी सूर्यकांत चोडणकर व जितेंद्र गावकर यांच्यावर भादंस कलम 341, 143, 353 व 149 अंतर्गत गुन्हा नोंद केला. शुक्रवारी सकाळी सूर्यकांत चोडणकर व जितेंद्र गावकर यांनी स्वतः पेडणे पोलीस स्थानकात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान धारगळ येथील तसेच शेमेचे आडवण नागझर उगवे येथील मोपा पीडित शेतकऱयांनी पेडणे पोलीस स्थानकावर भव्य मोर्चा नेऊन सरकार व स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या दडपशाहीचा निषेध केला. गोव्याच्या विविध भागातून अनेकांनी येऊन दोघांना पाठिंबा देत सरकारच्या कृतीचा निषेध केला. यावेळी म्हापसा येथील पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पेडणे मामलेदार अनंत मळिक पेडणे पोलीस स्थानकावर दाखल झाले.
यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, मांदेचे नेते दीपक कळंगुटकर, गोवा सुरक्षा मंचचे विनायक च्यारी, स्वरुप नाईक, राष्टवादी गोवाचे सरचिटणीस संजय बर्डे, मगोचे पेडणे प्रवक्ते उमेश तळवणेकर, आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, मगो नेते प्रविण आर्लेकर, गोंयचो आवाजचे सहनिमंत्रक कॅप्टन विरीयाटो फर्नांडिस, स्वप्नेश शेर्लेकर, मोपा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुबोध महाले, भरत बागकर, नारायण गडेकर, उदय महाले, पर्यावरण प्रेमी अभिजीत प्रभूदेसाई, डायना तावारीस तसेच मोठय़ा संख्ये शेतकरी पुरुष व महिला उपस्थित होते.
सरकार बेकायदेशीरित्या जमीन संपादन करत आहे : किरण कांदोळकर
सरकार बेकायदेशीर जमीन संपादन करत आहे. जमीन संपादन कायदा राज्यसभेत मंजूर न होताच सरकार हे काम करत आहे. शेतकऱयांचे हीत सरकारने जपावे. गरीब शेतकऱयांच्या जमिनी सरकार खरेदी करुन दिल्ली येथील पैसेवाले आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या घशात घालू पहात आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सत्तेचा गैरपावर करुन शेतकऱयांना आणि आमच्या दोघांवर खोटय़ा तक्रारी घालून सरकारी अधिकाऱयांवर दबाव आणत आहे. या सरकारच्या कृतीचा किरण कांदोळकर यांनी निषेध केला.
पेडणेतील अधिकाऱयांनी पदाची शान राखावी : उमेश तळवणेकर
पेडणेतील अधिकारी हे बाबू आजगावाकर यांच्या सांगण्यावरुन सर्वसामान्य नागरिकांना सतावत असून पेडणेतील आमच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यास पेडणे पोलिसांनी केलेले काम योग्य नसून त्यांनी आपल्या पदाची शान राखावी. बाबू आजगावकर यांच्या दबावाखाली अधिकारी गैरकाम करुन पेडणेतील नागरिकांची सतावणूक यापुढे करतील तर सर्व एक होऊन या अधिकाऱयांची हाकलपट्टी केली जाईल, असा इशारा उमेश तळवणेकर यांनी दिला.
यावेळी दीपक कळंगुटकर म्हणाले, शेतकऱयांच्या जमिनी सरकारने यापुढे घेऊ नयेत. सरकारने पेडणेत मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांच्या जमिनी घेतल्या. आता मोपा विमानतळासाठी राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी परत जमिनी संपादन करु पाहत आहे. या मोपा विमानतळ प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्गाची गरज नाही. याठिकाणी यापुढे पेडणेवासीयांच्या सुखदुःखात सरमस होणारा लोकप्रतिधी पेडणेकरांनी निवडून देणे आवश्यक आहे.
बाबू आजगावकर हे पेडणेतील जनतेच्या मतावर निवाडून येऊन त्यांनाच सराकारी यंत्रणेला हाताशी धरून छळत आहेत. यापुढे त्यांनी पेडणेतील जनतेवर खोटय़ा तक्रारी दाखल करुन त्यांची सतावणूक केल्यास त्यांच्या सर्व भानगडी तसेच त्यांनी केलेले घोटाळे बाहेर काढणार, असा इशारा गोंयचो आवाज संघटनेचे सहनिमंत्रक स्वप्नेश शेर्लेकर यांनी दिला.
यावेळी विनायक च्यारी, स्वरूप नाईक, संजय बर्डे, शेतकरी मानोज साळगावकर अर्जुन साळगावकर, उदय महाले, प्रशांत शिरोडकर, वासंती तुळस्कर आदीनी सरकारने आमच्या जमिनी घेऊ नये अन्यथा मेळावलीची पुनरावृत्ती होणार असा इशारा दिला. सायंकाळी समाजिक कार्यकर्ते सूर्यकांत चोडणकर व ऍड. जितेंद्र गावकर यांना न्यायालयात हजर केले आसता जामीन मंजूर करण्यात आला.