आमदार तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष दयानंद सोपटे यांचे आवाहन, भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
पेडणे (प्रतिनिधी )
पेडण्याला मराठीचा जाज्वल्य इतिहास आहे. या लोकभूमीने अगदी मनापासून ही भाषा जपली आहे, सांभाळली आहे. बारा वर्षानंतर होणारे हे 28 वे मराठी साहित्य संमेलन आपल्या सर्वांसाठी खास आहे व आम्ही सर्व मिळून ते यशस्वी करूया, असे मनोगत स्वागाध्यक्ष श्री दयानंद सोपटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे 28 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम जाहीर करण्याच्यादृष्टीने आयोजित पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष राजमोहन शेटये, गो.सा.से. मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, गुरुनाथ नाईक, उपाध्यक्ष विठ्ठल गावस, हेमंत खांडेपारकर व चंद्रकांत सांगळे हे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, नियोजित कार्यक्रम हा साचेबंद कार्यक्रम आहे. पेडण्यातील सर्व ज्ये÷ साहित्यिक, कवी-कवियत्री व मराठीप्रेमी यांना यात सामावून घेतले आहे. त्यामुळे इथला प्रत्येक सादर होणारा कार्यक्रम हा आपला कार्यक्रम आहे. अनेक साहित्यिक यानिमित्त पेडण्यात येणार आहेत. त्यांच्या साहित्य प्रवासाचा लाभ निश्चितच आपले पुढील भावी साहित्यिक घेतील, अशी आमची इच्छा आहे. तरी सर्व गोमंतकातील व पेडण्यातील तमाम साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी व विशेष करून मराठी भाषाप्रेमींनी या साहित्य संमेलनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सदर पत्रकार परिषदेत संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्ये÷ साहित्यिक विजय कापडी यांचे नाव जाहीर केले गेले. यानिमित्त गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी साहित्य सेवक मंडळाची वाटचाल व त्याचा आढावा घेतला. पेडण्यात होऊ घातलेले हे संमेलन ऐतिहासिक संमेलन असेल त्यामुळे या संमेलनास भरघोस प्रतिसादही मिळत आहे, सर्व मिळून संमेलन यशस्वी करूया असे नमूद केले. साहित्यिक तथा आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब यांनीही पूर्वीच्या अनेक ज्ये÷ साहित्यिकांच्या कार्याचा उजाळा यानिमित्त घेतला व हे संमेलन एक तपानंतर होते आहे व ते पेडणे येथे होत आहे यासाठी पेडणे येथील साहित्यप्रेमी कौतुकास पात्र आहेत असे उद्गार काढले.
कार्याध्यक्ष राजमोहन शेटये म्हणाले की, या कार्यक्रमास संत तुकारामाचे आठवे वंशज सदानंद राव मोरे हे खास आकर्षण आहे. त्यामुळे संत परंपरा असलेले संमेलन तुम्हा आम्हा सर्वांसाठी गौरवशाली आहे. स्वागत व प्रास्ताविक रमेश वंसकर यांनी केले तर कार्याध्यक्ष राजमोहन शेटये यांनी आभार मानले.
कार्यक्रम : 8 व 9 मे 2021
शनिवार 8 मे संध्या 3.00 वाजता : ग्रंथ दिंडी (श्री भगवती देवस्थानाकडून संमेलन ठिकाणी प्रवास) , संध्या. 4.00 वा. : उद्घाटन
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते. होणार असून उपमुख्यमंत्री बाबू मनोहर आजगावकर सन्माननीय अतिथी सदानंदराव मोरे , दयानंद सोपटे आमदार स्वागताध्यक्ष, रमेश वसकर गो.सा.से चे अध्यक्ष, कापडी संमेलनाध्यक्ष, राजमोहन शेटये कार्याध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
- संध्या. 5.30 वा. परिसंवाद
- विषय : गेल्या वीस वर्षानंतरचे गोमंतकीय साहित्य
- संध्या. 6.00 वा. निवडक कवींचे कविसंमेलन.
- रात्री 8.00 वा. : सांस्कृतिक कार्यक्रम नृत्योत्सव
- (भरतनाटय़म, मराठी लोक नृत्ये व दशावतार)
- संयोजिकाः शीतल य. तेली – रविवार 9 मे सकाळी 8.00 वा.
- सांस्कृतिक कार्यक्रम
- (मराठी भाव भक्ती आणि नाटय़संगीत)
- सकाळी 9.00 वा. परिसंवाद महिलांसाठी
- विषय : आजचे साहित्य व महिलांचे योगदान – सकाळी 10 वाजता
- सदानंद राव मोरे ( संत तुकारामाचे आठवे वंशज प्रकट मुलाखत) संगीता अभ्यंकर मुलाखत घेणार.
- सकाळी 11.00 वा. परिसंवाद
- विषय : गोव्याची नव्या परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल चालू आहे का?
- दुपारी 12.00 वा. परिसंवाद
- विषय : मराठी भाषा आणि समाज माध्यमे – दुपारी 2ः30 वा नाटय़ सवेश सादरीकरण
- ( एकूण पाच नावाजलेल्या संगीत वारसा जपलेल्या नाटकांचा प्रवेश सादरीकरण)
- 1. गुरुकृपा संगीत संस्था तांबोसे
- संगीत मंदारमाला
- 2. श्रींची इच्छा थिएटर, हरमल
- चांदणे शिंपीत जा
- 3. अभिनव कला थिएटर्स मांदे
- ययाती आणि देवयानी
- 4. सार्वजनिक गणेश उत्सव सांस्कृतिक आणि क्रीडा संघ, मोरजी
- शिक्का कटय़ार
- ,5. ओम कला सांस्कृतिक केंद्र, हळर्ण
- आर्य चाणक्मय – संध्या 4.00 वाजता
समारोह कार्यक्रम व मराठी साहित्यिकांचे सत्कार संध्या 7.30 वा. संतश्रे÷ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी नाटक संगीत ‘तुका आकाशा एवढा’ श्री महालक्ष्मी युवक संघ तळावली फोंडा महिला गट
लेखकःदिग्दर्शक प्रसाद तुकाराम सावंत आहेत.