पॉझिटिव्हीटी वाढून न देण्यासाठी प्रयत्न करा
प्रतिनिधी/ सातारा
तब्बल चार महिन्यानंतर शुक्रवारी जिह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 2 टक्केच्या खाली घसरून 1.85 वर आला. गेल्या 24 तासातील कोरोना चाचण्या व रूग्णवाढीचा हा पॉझिटिव्हीटी रेट असला तरी पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे हे जिल्हावासियांसाठी सुखद आहे. चार महिन्यात अनेकदा कोरोनाची धक्कादायक वाढणारी रूग्णसंख्या, अचानक वाढलेला मृत्यूदर आणि कडक लॉकडाऊन या अडचणीत होरपळल्यानंतर सप्टेंबर महिन्यात कुठे तरी या वातावरणातून जिल्हा बाहेर पडत आहे.
रुग्ण वाढ आटोक्यात आली
सातारा, फलटण, कराड, खटाव, माण, कोरेगांव या तालुक्यातही कोरोना रूग्णवाढ आटोक्यात येत आहे. गणेशोत्सवातही सातारकरांनी प्रचंड संयम पाळत साधेपणाने उत्सव साजरा केला. मात्र बाजारपेठांमधील नियमांची पायमल्ली कायम आहे. त्यामुळे जिह्याचा कमी होत असलेला पॉझिटिव्हीटी रेट वाढू न देणे ही जबाबदारी प्रत्येक सातारकर जिल्हावासियांची आहे. या जबाबदारीचे भान प्रत्येक तालुक्याने, प्रत्येक शहराने, गावाने, घराने आणि नागरिकाने ठेवले तर जिह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे व्हायला सुरूवात होईल. अनंत चतुदर्शीच्या निमित्ताने सर्वच जिल्हावासियांनी कोरोनाचे विसर्जन करून कोरोनामुक्त जिल्हा करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. दरम्यान, शुक्रवारी 203 रूग्णांची वाढ झाली असून 488 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शिवाय आज जिह्यात एकही मृत्यू नसल्याचा दिलासा आहे.
शुक्रवारी 77,423 जणांचे लसीकरण
जिल्हय़ाला पुन्हा शासनाकडून लसीचे डोस मोठय़ा प्रमाणावर आले असून यामुळे शुक्रवारी 77 हजार 423 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे एकूण लस घेणाऱया नागरिकांची संख्या 22 लाख 76 हजार 144 एवढी दिलासादायक झाली असून यामध्ये पहिला डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 16 लाख 39 हजार 735 झालेली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 36 हजार 409 एवढी झाली आहे.
शहरी भागात लसीकरणाचा टक्का कमी
जिल्हयात 16 जानेवारी 2021 रोजी पासुन कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. जिल्हयातील 18 वर्षावरील नागरीकांना आजपर्यंत लसीचा पहिला 1586400 व दुसरा डोस 618942 देण्यात आला आहे. लसीकरणाचा स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय आढावा मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नुकताच घेतला. या आढाव्यात जिल्हयातील शहरी कार्यक्षत्रातील नागरीकांचे लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरी/ निमशहरी क्षेत्रातील नागरीकांचे लसीकरण वाढवण्यासाठी नियोजन आवश्यक असल्याच्या सुचना त्यांनी नगरपरिषदांना केल्या आहेत. लसीकरणाचा टक्का वाढवताना यापुढे प्रत्येक नगरपरिषदेने वार्डनिहाय, लाभार्थ्यांची यादी अपडेट करून पाठवणे सक्तीचे केले आहे.
सातारा 44 तर फलटण 35 रूग्णवाढ
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावली 4(9918), कराड 18(38566), खंडाळा 3(13996), खटाव 37(25071), कोरेगांव 15(21552), माण 27 (17419), महाबळेश्वर 1(4643), पाटण 2 (10136), फलटण 35 (36216), सातारा 44 (50540), वाई 13 (15612), व इतर 4 (2016) असे आज अखेर एकूण 2,45,685 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिह्यामध्ये एकूण 6,022 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
रूग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्ती दुप्पट
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 488 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.