वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोको या कंपनीने भारतीय बाजारात आपला मध्यम रेंजमधील स्मार्टफोन एक्स 3 प्रो सादर केला आहे. हा फोन म्हणजे मागील सप्टेंबरमध्ये सादर केलेल्या एक्स 3चीच सुधारीत आवृत्ती असणार आहे. नवीन स्मार्टफोनसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 860 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा मिळणार असून सदरचा फोन भारतीय बाजारातील सॅगसंग गॅलेक्सी एफ62, रियलमी एक्स7 आणि वीवो व्ही20 2021 यांना टक्कर देण्याचे संकेत
आहेत.
कंपनीने सदरचा स्मार्टफोन दोन प्रकारामध्ये सादर केला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असणाऱया मॉडेलची किमत ही 18,999 रुपये तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज मॉडेलची किमत ही 20,999 रुपये राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.