तीन ट्रक ताब्यात : रेती वाहतूक करणाऱया ट्रकचालकाला अटक : रेती व्यावसायिकावर गुन्हा नोंद
पेडणे (प्रतिनिधी ) पेडणे तालुक्मयात लाॕकडाऊन काळात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर रेती व्यावसाय सुरु असून गेली काही दिवस बंद असलेला बेकायदेशीर रेती व्यवसायाने परत डोके वर काढले असून सरकारी यंञणेला हाताशी धरुन हा व्यवसाय परत जोमाने सुरू झाला आहे. या रेती व्यवसायावर अखेर पेडणे पोलिसांनी मंगळवारी सकाळी 8.30 वाजता पोरस्कडे येथे बेकायदेशीर रेती व्यवसायावर धाड घालून रेतीचे तीन ट्रक पकडले. तिन्ही ट्रक चालकावर तर बेकायदेशीर रेती व्यवसाय करणारे होडय़ाचे मालक यांच्या विरोधात खनिज कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
- तीन ट्रक चालकाना अटक
- पेडणे पोलिसांनी सकाळी 8.30 वाजता पोरस्कडे येथे बेकायदेशीर रेती व्यवसाय सुरू असल्याने या रेती व्यवसायावर धाड घातली. या धाडीत रेतीचे तीन ट्रक जी.ए.03- के 8396 , जीए.08 यु,5756 व जीए.09 यु 3881 हे तीन ट्रक व ट्रकचे चालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली.
- बेकायदेशीर रेती व्यवसायत असलेल्या चार जणांवर गुन्हा नोंद
पोरस्कडे येथे धाडीत रेती व्यवसायात असलेले मुळगावकर, जुवांव फर्नांडिस, ज्ञानेश्वर हळदणकर व बस्त्याव फर्नांडिस या चार जणावर खनिज कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक यांनी पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोरस्कडे येथील बेकायदेशीर रेती व्यवसायात गुतलेल्या प्रकरणी कारवाई करत गुन्हा नोंद केला. पेडणे पोलीस पुढील तपास करत आहे.
- एक महिना बंद असलेला बेकायदेशीर रेती व्यवसाय परत सुरळीत सुरू
लाॕकडाऊन दरम्यान सुमारे एक महिना बंद असलेला रेती व्यवसाय परत जोमाने सुरु झाल्याने आठशे ते एक हजार रुपये प्रती मीटर दराने ही रेती विकली जात असून सध्या रेतीला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.
- लाॕकडाऊन काळात रेती कामगारांच्या जेवणाचा खर्चाचा भार मालकानी उचलला
लाॕकडाऊनच्या सुरुवातीला एक महिना हा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. या काळात या रेती कामगाराना महिनाभर अन्न साहित्य मालकाना द्यावे लागले.त्यामुळे लाॕकडाऊन काळात त्यांची चिंता वाढली होती. माञ सरकारने काही नियम शिथील केल्याने हा व्यवसाय आता तेजीत आहे.
- पेडणेतील सरकारी अधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरळीत रेती व्यवासाय
पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात सध्या हा बेकायदेशीर रेती व्यावसाय सुरु असून या व्यवसायाला सरकारी अधिकारी यांचे संरक्षण आणि आशीर्वाद आहेत.त्यांच्या आशीर्वादाने हा व्यवासाय सध्या सुरु आहे.
- पेडणे तालुक्मयातील सरकारी अधिकारी यांना महिन्याला लाखो रुपये
खास सूञांकडून मिळालेल्या माहिती नुसार एका होडी मागे एका खात्याच्या अधिकारी याला पाच हजार , दुसऱया अधिकारी याला एका होडी मागे तीन हजार तर अन्य एका विभागातील आधिकारी यांना एका होडी मागे दोन हजार रुपये महिन्याला हे अधिकारी आपल्या कर्मचाऱयांकडून गोळा करतात व ते कर्मचारी हे पैसे आपल्या साहेबांना देतात.सध्या या अधिकाऱयांचीच चांदी झाली असून जे रेती व्यवसायिक हे प्रत्येक अधिकारी यांना पैसे देऊन ञस्त झाले आहेत.
- बेकायदेशीर धंद्याला सरकारी अधिकारी यांचे अभय
ऐरवी साध्या साध्या कारणासाठी सर्वसामान्य नागरिकांना कायदा आणि नियम सांगणारे हे अधिकारी माञ बेकायदेशीर धंद्याना लाच खावून अभय देत असल्याबद्दल या अधिकारी वर्गाच्या बाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- रेती ट्रकांवर सरकारी कामासाठी आॕन गर्वमेंट डय़ुìाr असे कागद चिटकविले
सध्या दिवासाला शेकडो ट्रक रेती घेऊन जात असून बहुतेक ट्रकवर सरकारी कामासाठी रेती नेण्यात येत असल्याचे कागद आणि परवाना चिटकविला असल्याने गोव्यात सरकारी कामावर ऐवढय़ा मोठय़ा संख्येने हे ट्रक सरकारने आपल्या कामावर कसे काय घेताले असा प्रश्न नागरिक करत आहेत.
- किनारी पोलीस यानाही हप्ता ?
तेरेखोल येथे किनारी पोलीस पोष्ट आहे.या पोलिसांचे काम हे नदीत बेकायदेशीर वाळू तसेच अन्य नदीच्या हिताआड येणाऱया गोष्टीं रोखण्याचे माञ हे किनारी पोलीस सध्या गप्प असल्याने यांनाही प्रत्येक होडी मागे महिन्याला हप्ता असल्याची चर्चा असून यासाठीच हे किनारी पोलीस डोळय़ावर पट्टी बांधून गप्प आहेत.
- रेती व्यवासायाला सरकारी अधिकारी यांचे ग्रहण
पेडणे तालुक्मयातील रेती व्यवसाय हा बेकायदेशीर असल्याच्या धमक्मया सरकारी अधिकारी यांच्याकडून देण्यात येत असून हा धंदा चालण्यासाठी या अधिकारी यांनी मोठय़ा प्रमाणात महिन्याला हप्ता दिला जातो. हे सर्व सेटिंग अधिकारी यांच्या कार्यालयातील हातखालचे कर्मचाऱयांच्या मार्फत होते.त्यामुळे महिन्याला एक एक अधिकारी लाखो रुपये या रेतीच्या व्यवसायावर कमावतो.
- रेती कायदेशीर व्हावी यासाठी अनेक वेळा हे रेती व्यवसायिक मागणी करत होते. माजी मुख्यमंञी मनोहर पर्रीकर यांना हा व्यवसाय कायदेशीर करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असा आश्वासन विधानसभा निवडणूक दरम्यान दिले होते माञ तेही नंतर हवेतच विरले.
ड़ ही पोलीस कारवाई फक्त पोरस्कडेच कि अन्य ठिकाणी होणार ?
पेडणे पोलिसांनी मंगळवारी पोरस्कडे येथे बेकायदेशीर रेती व्यवसायावर धडक कारवाई केली. ही कारवाई फक्त पोरस्कडे कि अन्य ठिकाणीही पोलीस करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.