वृत्तसंस्था / लिस्बन
पोर्तुगाल फुटबॉल संघातील खेळाडू जोआव कॅन्सेलो याला कोरोनाची बाधा झाल्याने तो सध्या सुरू झालेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत खेळू शकणार नाही. पोर्तुगाल संघात कॅन्सेलोच्या जागी आता डेलॉटचा समावेश करण्यात आला आहे.
2021 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील पोर्तुगाल संघाचा फ गटातील सलामीचा सामना हंगेरीबरोबर बुडापेस्ट येथे मंगळवारी होणार आहे. 2016 साली रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने युरो चषक फुटबॉल स्पर्धा ज्ंिाकली होती. बुडापेस्टला रवाना होण्यापूर्वी 48 तास अगोदर या संघाला कॅन्सेलोचा कोरोना बाधित वृत्ताने धक्का दिला आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगालचा दुसरा सामना म्युनिचमध्ये होणार असून त्यानंतर तिसरा सामना विश्व करंडक विजेत्या फ्रान्सबरोबर 23 जूनला बुडापेस्टमध्ये होणार आहे. पोर्तुगाल संघातील कॅन्सेलोला आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.