सावंतवाडी / प्रतिनिधी:-
कोरोनाच्या पहिल्या लाटेत बर्याच पोलिस कर्मचाऱ्यांना कोरीनाशी सामना करावा लागला होता. तिच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवताना दिसत आहे. फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून पोलिस कोरोना काळात सक्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंग व्हॅनचा चालक रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चालक पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यासोबत व्हॅनमध्ये असलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात रहाणं गरजेचे ठरणार आहे.