मुंबई \ ऑनलाईन टीम
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रडारवर असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि ईडीने प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही धाड टाकल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. परंतु, नंतर हा तपास काहीसा थंडावला होता. मात्र, आता प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाड टाकल्यामुळे याप्रकरणात नवी माहिती पुढे येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Trending
- Ratnagiri Crime News : स्कीममध्ये पैसे गुंतवल्याने तरूणाला 11 लाखांचा गंडा
- Ratnagiri News : मिऱ्या येथे ‘योमन मरीन’ची बंद गेट बळजबरीने उघडली
- सहायक उद्यान निरीक्षकास 17 हजारांची लाच घेताना एसीबीकडून अटक
- कपिलेश्वर कॉलनीतील घरांमध्ये शिरले ड्रेनेजचे पाणी
- एमआयडी’तील भुखंडावर पेट्रोल पंप, ई चार्जिंग सेंटर; केएमटीकडून भूखंड वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
- शांतता कमिटी केवळ कागदावरचीच…
- राणेंसारख्या वाचाळवीरांवर पक्षाने बंदी घालावी; संजय काकडे यांचा भाजपला घरचा आहेर
- गणेशोत्सव खटल्यातून क्षीरसागर यांच्यासह खंडोबा तालमीचे कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता