मुंबई/ ऑनलाईन टीम
मनी लॅान्ड्रींगच्या आरोपात अडचणीत आलेल्या शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयानं सरनाईक यांच्यासह त्यांची दोन मुले व निकटवर्यीत योगेश चंडेला यांना येत्या २८ जुलै पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. उच्च न्यायालाच्या या निर्णयामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे
मनी लॅान्ड्रींग प्रकरणी ईडीने सुडबुद्धीने कारवाई करुन नये यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने अटक करु नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. दरम्यान सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा पूर्वेश, विहंग आणि मेहुणा योगेश चांदेगला यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज उच्च न्यायालयाने सुनावणी देत आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत.
ईडीच्या ससेमिऱ्यामुळं त्रस्त झालेल्या सरनाईक यांनी मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. माझ्यासह शिवसेनेच्या इतर आमदार, मंत्र्यांची ईडीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून केली होती. सरनाईक यांच्या या पत्रामुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
Trending
- श्वानाला मिळाली मानद पदविका
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
- प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा
- एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
- चार गॅरंटींची आज घोषणा?
- पर्यटकांमुळे अंटार्क्टिकात वितळतोय बर्फ
- आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोराला कंठस्नान
- तांत्रिक बिघाडामुळे चामराजनगरजवळ कोसळले प्रशिक्षण विमान