प्रतिनिधी / बांदा:
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी विविध योजना आणल्या. महाराष्ट्रमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेत पोहचविण्याचे काम अभियानाच्यावतीने करण्यात येत आहे. अशी माहिती प्रदेश सचिव नारायण सावंत यांनी दिली. एमचसीईटी, जेईई आणि नीट परीक्षेच्या २०२३ करीता ऑनलाईन पूर्वतयारीसाठी मोदी सरकारने योजना आणली आहे. ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी या प्रवर्गातील नॉनक्रिमीलीयर उत्पन्न गटातील विद्यार्थी यांना याचा फायदा होणार आहे. ही योजना 30 नोव्हेंबरपर्यंत चालू आहे. सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल येथे रविवार दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता कॅम्पचे आयोजन केले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत यांनी केले आहे.
Previous Articleपोलीस ठाण्यात पेटवून घेतलेल्या ‘त्या’ तरुणाच्या मृत्यू
Next Article शवविच्छेदन केलेल्या मृतदेहाचे अवयव होत आहेत गायब
Related Posts
Add A Comment