वार्ताहर / कुंभोज
कुंभोज, हिंगणगाव, नेज परिसरातील अपंग बांधवांना प्रहार दिव्यांग संघटने मार्फत अंतोदय रेशन कार्ड, ५०% घरफाळा सवलत, युडीआयडी कार्ड व इतर शासकीय योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यसाठी व लाभ मिळवुन देण्यासाठी कुंभोज परिसरातील दिव्यांग बांधवांचा मेळावाचे आयोजन मंगळवार दिनांक 20 रोजी सकाळी दहा वाजता शिवानंद महाराज ढवळीकर मठ कुंभोज येथे करण्यात आले आहे.
सदरच्या कार्यक्रमाला कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम पाटील, इचलकरंजी शहर अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष इरफान बागवान उपस्थित राहणार आहेत व मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळावाला सर्व अपंग बांधवांनी उपस्तित राहून याचा लाभ घ्यावा. मेळावाचे ठीकण, श्री सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर मठ पाण्याची टाकी समोर कुंभोज
दिनांक – मंगलवार २० – १० -२०२० सकाळी १०.०० वाजता आदिक माहिती साठी संपर्क –
शाहनवाज माकानदार 9921878430 सुरेश कोळी 9960203198 पत्रकार विनोद शिंगे कुंभोज
Previous Articleपंतप्रधान आवास घरकुल योजनेतुन खरे लाभार्थी वंचितच
Next Article सोलापूर शहरात १७ नवे कोरोना रुग्ण ; एकाचा मृत्यू
Related Posts
Add A Comment