ओटवणे / प्रतिनिधी-
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील विद्या विकास अध्यापक विद्यालय आजगावचे प्राचार्य ए. एन. माळगे यांचे वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागप्पा माळगे (८२) यांचे बुधवारी ३० जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळचे गडिंग्लज येथील असलेल्या नागप्पा माळगे यांनी प्राथमिक शिक्षक ते मुख्याध्यापक अशी सेवा बजावली होती. शिस्त प्रिय व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती.