खडकलाट : कर्नाटक सरकारकडून आरोग्य आणि कोरोना महामारीवर मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करण्यात येत असल्याचा केवळ कांगावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात जिल्हय़ातीलही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गरीब व इतर रुग्णांचे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक सेवा पुरवाव्यात, अशी मागणी भोज जि. पं. सदस्य व जिल्हा आरोग्य आणि शिक्षण स्थायी समिती सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केली. ते म्हणाले, शासनाचे आरोग्य खात्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही. रेडिओलॉजिस्टच्या जागा रिकाम्या आहेत. इस्पितळात स्कॅनिंग, एक्स-रे, सी. टी. स्कॅन, एमआरआय व्यवस्थेसाठी आधुनिक मशिनरी आहे. मात्र सरकारी इस्पितळ (बिम्स) वगळता जिल्हय़ात रेडिओलॉजिस्टची जागा भरली नाही. यामुळे आरोग्य खाते तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे लक्ष देत आवश्यक सुविधा पुरवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.
Previous Articleज्योती सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या सोनल सौदागर यांना निरोप
Next Article नरेगातून अलतगा येथे 14 लाखांच्या कामांना प्रारंभ
Related Posts
Add A Comment