महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघाची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अप्पर मुख्य शिक्षण सचिव कार्यालयाने प्राथमिक शाळांना अंगणवाडीचा वर्ग जोडला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्ग बालवाडीचे वर्गही प्राथमिक शाळांना जोडो, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांना दिले. या संघटनेचे नेतृत्व राज्य कार्याध्यक्ष संतोष आयरे यांनी केले.
निवेदनात म्हंटले आहे, अंगणवाडीप्रमाणेच 3 ते 6 या वयोगटातील बालकांना शिक्षण देत असलेल्या महापालिकेच्या व खाजगी बालवाडीचे वर्ग प्राथमिकला जोडल्या नाहीत. हा बालवाडीच्या सेविका, कर्मचारी व विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. बालवाडीची नोंद शाळा यु डायसमध्ये असताना सरकार हा अन्याय का करीत आहे. लवकरात लवकर बालवडीचे वर्ग प्राथमिक शाळांना न जोडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हा सहसचिव सविता ढावरे, खजानीस जयश्री पाटील, सुनिता आलुगडे, आदी बालवाडी सेविका उपस्थित होत्या.